Jaimaharashtra news

चितळे बंधू आता दुपारी 1 ते 4 ही सुरु

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

पुणे म्हटलं की इतरांना दुपारी 1 ते 4 या वेळेत बंद असणारी दुकानंच डोळ्यासमोर येतात.

 

मात्र, 1 जुलै 2017 हा दिवस पुणेकरांसाठी ऐतिहासिक म्हणावा लागेल. चितळेंचं दुकान यापुढे दुपारी 1 ते 4 या वेळेतही सुरु राहणार आहे.

 

ग्राहकांच्या सेवेसाठी पुण्यातील डेक्कन परिसरातील चितळ्यांचं दुकान आता दुपारीही सुरु ठेवण्यात येणार आहे.

 

Exit mobile version