‘खासगी’ टोलनाक्याचा मनमानी कारभार उघड

पुणे – सातारा रोडवरील खेड शिवापूर मार्गावरील ‘खासगी’ टोलनाक्याचा मनमानी कारभार उघड झाला आहे. ‘खासगी’ टोलनाक्यामार्फत वसूली सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी याबाबतचा व्हिडीओ ट्विट केला आहे. प्रवासी नागरिकांवर टोल भरण्यासाठी दादागिरी केली जात असून याबाबत पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिला असता त्यांना पोलिसांचीही भिती नसल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे ‘ही टोळी कुणाची आणि कुणासाठी वसूली चालू आहे ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

‘१९० रुपये टोल वसुली केली जाते, मात्र पावती दिली जात नाही. खेड शिवापूर टोल नाक्यावर ही नेमकी कसली दादागिरी चालू आहे? कुणाच्या आशीर्वादाने हे सुरू आहे?’, असा सवालही यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.

Exit mobile version