Sun. May 16th, 2021

शिवाजी पार्क नाही, ‘छत्रपती शिवाजी महाराज पार्क’

प्रसिद्ध आणि ऐतिहासिक अशा मुंबईतील दादरमधील शिवाजी पार्कचं नामांतरण करण्यात येणार आहे. आता शिवाजी पार्क ऐवजी छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं संबोधण्यात येणार आहे.

या नामकरणाच्या प्रस्तावाला बुधवारी ११ मार्चला पाालिका सभागृहाच्या बैठकीत मंजूरी देण्यात आली.

देशाचे आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख होतो.

यामुळे शिवाजी पार्कचे नाव छत्रपती शिवाजी महाराज पार्क करावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींकडून करण्यात येत होती.

तसेच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनीही अशी मागणी केली होती. यानंतर हा ठराव महासभेत मांडण्यात आला.

आता या ठरावाला मंजूरी देण्यात मिळाली आहे. त्यामुळे आता शिवाजी पार्कचं छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करण्यात येणार आहे.

शिवाजी पार्कला ऐतिहासिक असा वारसा आहे. हे केवळ मैदान नसून अनेक ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार आहे. याच पार्कावर शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा घेण्यात आला.

तसेच अनेक राजकीय पक्षांच्या जाहीर सभादेखील या पार्कवरच घेतल्या जातात.

तसेच या पार्कवर अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीचे खेळाडू घडले आहेत.

या मैदानावर घडलेल्या अनेक नावांपैकी एक म्हणजे सचिन तेंडुलकर. या पार्कवर राजकीय कार्यक्रमासह सांस्कृतिक आणि क्रीडा महोत्सवाचेही आयोजन केले जाते.

शिवाजी पार्क मैदानाला १० मे १९२७ ला नाव देण्याचा ठराव पालिकेने मंजूर केला होता.

काही दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील चिखळठाण्यातील विमानतळाचे नाव आता छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे करण्यात आले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. त्याचप्रमाणे औरंगाबाद महानगरपालिकेने देखील धर्मवीर राजे संभाजी भोसले विमानतळ’असं नाव करण्याबाबत ठराव संमत केला आहे.

तसेच काही वर्षांपूर्वी सीएसटी रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छशिमट म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस असं करण्यात आलं होतं.

दरम्यान आज गुरुवारी राज्यात शिवाजी महाराजांची जयंती (तिथीप्रमाणे) साजरी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *