Mon. Aug 19th, 2019

‘हा’ तामिळ सुपरस्टार साकारणार एकाच सिनेमात 25 विविध भूमिका

0Shares

तामिळ सुपरस्टार ‘चियान विक्रम’ आपल्या अभिनयासाठी केवळ तामिळ चाहत्यांमध्येच नव्हे, तर देशभरात प्रसिद्ध आहे. विविध सिनेमांत विविध व्यक्तिरेखा साकरताना तो स्वतःमध्ये इतके बदल करतो, की त्याच्या एका सिनेमातच 2 ते 3 कॅरेक्टर्स पाहिल्याची गंमत प्रेक्षकांना मिळते. ‘अपरिचित’ या सिनेमामुळे तो देशभरातल्या चाहत्यांचा फेव्हरेट बनला. या सिनेमात त्याने साकारलेल्या ‘अम्बी’, ‘रेमो’ आणि ‘अपिरिचित’ या तीन व्यक्तिरेखांमध्ये तो एकाचवेळी इतका वेगवेगळा वाटायचा की प्रेक्षक हैराण व्हायचे.

या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.

याशिवाय ‘I’ या सिनेमातही त्याने पहिलवान, मॉडेल, हिंस्त्र श्वापद आणि कुबड अलेल्या व्यक्तीच्या आव्हानात्मक भूमिका केल्या होत्या.

‘इरू मुगन’ या सिनेमात त्याने पोलीस ऑफिसर आणि गे व्हिलन अशा दोन्ही भूमिका केल्या होत्या.

आपल्या भूमिकांमध्ये इतकं वैविध्य जपणाऱ्या विक्रमचे चाहते नेहमीच आता पुढच्या सिनेमात तो कोणती वैशिष्ट्यपूर्ण भूमिका करणार याबद्दल उत्सुक असतात. तर आता पुन्हा एकदा विक्रम नव्या आव्हानासाठी तयार झालाय.

आगामी सिनेमात चियान विक्रम दोन किंवा 3 नव्हे, तर चक्क 25 भिन्न भिन्न भूमिका साकारणार आहे.

अजय ज्ञानमुथू या सिनेमाचे दिग्दर्शक असतील. च्या चित्रपटात काम करणार आहे.

ललिथ कुमार आणि व्हायकॉम 18 या चित्रपटाची निर्मिती मिळुन करत आहेत.

या चित्रपटाची गाणी संगीतकार ए.आर. रहमान संगीतबद्ध करणार आहेत.

हा सिनेमा रिलीज झाल्यावर एकाच सिनेमात 25 विविध पात्रं रंगवण्याचा जागतिक विक्रम हा विक्रमच्या नावावर जमा होईल.

याआधी हा विक्रम तामिळ सिनेसृष्टीतील प्रयोगशील अभिनेता कमल हासनच्या नावावर आहे. ‘दशावताराम’मध्ये कलम हासन यांनी 10 विविध भूमिका केल्या होत्या.

याआधीही तामिळ सिनेमात शिवाजी गणेशन यांनी ‘नवरात्र’ चित्रपटात नऊ भूमिका साकारल्या होत्या.

 

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *