Thu. Sep 19th, 2019

निवडणुकीत पडण्याऐवजी मी मेलो का नाही – चंद्रकांत खैरे

0Shares

निवडणुकीत पडण्याऐवजी मी मेलो का नाही असा संवेदनशील प्रश्न शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसैनिकांना विचारला. माझं काय चुकलं शिवसैनिक का नाराज झाला? असा प्रश्न उपस्थित करत, मी ही शेवटची निवडणूक लढवणार होतो आणि त्यानंतर देशात शिवसेनेचा प्रचारक म्हणून काम करणार होतो.असं मी शिवसेना पक्षप्रमुखांकडे बोलून दाखवलं होतं असं मत खैरे यांनी उपस्थित केलं आहे.

पराभवाची खैरेंना खंत

औरंगाबाद जिल्ह्यातील शिवसेनेचा ३४ व वर्धापन दिवस साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना नेते विनोद घोसाळकर, चंद्रकांत खैरे,

मनीषा कायंदे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले होते.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांचा एमआयएमने पराभव केला.

चंद्रकांत खैरे पाचव्यांदा निवडणूक लढवत असताना त्यांचा धक्कादायक पराभव झाला.

या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी पहिल्यांदा जाहीर कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या.

मी खासदार असताना कामं केली नाही अशी ओरड केली गेली मात्र माझ्याकडे कामाची यादी आहे.

माझी काय चूक झाली? आता अनेक जण रडत आहेत पण आता काय करणार.

पराभवानंतर मातोश्रीवर गेलो त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह रश्मी ठाकरे देखील भावनिक झाल्या होत्या.

मी निवडून आलो असतो तर शहराला मंत्रिपदाचा मान मिळणार होता मात्र तो आता गेला.

शिवसेनेचा नेता हे मोठं पद असून काही चुकलं असल्यास माफ करा असं म्हणत खैरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *