Tue. Jan 18th, 2022

Chocolate Day – थोडासा रुसवा अन् थोडासा गोडवा

 

सध्या जगभरामध्ये  ‘Valentine Week’ साजरा होत आहे.तर आज  व्हेलेंटाईन वीकचा तिसरा दिवस आहे  म्हणजेच  ‘चॉकलेट डे’ आहे.

चॉकलेट तर सर्वांनाच आवडतात. पण व्हेलेंटाईन डे मध्ये ‘चॉकलेट डे’ सेलिब्रेट करण्याची मज्जा काही वेगळीच असते.

प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन आपण या दिवशी रुसवे-फुगवे दूर करून आपले प्रेम व्यक्त करतो.

चॉकलेट म्हणजे सर्वांचा जीव की प्राण असतं. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत चॉकलेटचं वेड हे सर्वांनाच असतं.

चॉकलेट खाण्याचे फायदेही खूप आहेत.

चॉकलेटचे फायदे:-

  • डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होण्यास मदत होते.
  • उच्चदाबाचा त्रास असेल तर चॉकलेट खूप फायदेशीर ठरते.
  • नियमित चॉकलेटच्या सेवनाने हृदयरोगाची शक्यता कमी होते.
  • चॉकलेट खाल्ल्याने तुमचा मूड चांगला राहतो.
  • आपली रोगप्रतिकारक शक्ती आणि स्मरण शक्ती वाढायला मदत होते.
  • कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात संशोधनानुसार चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
  • अमेरिकेच्या संशोधनानुसार रोज हॉट चॉकलेटचे 2 कप खाल्ल्याने मानसिक स्वास्थ चांगलं राहतं आणि स्मरणशक्तीही वाढते.

 

चला,तर मग  चॉकलेट देऊन आपले प्रेम  व्यक्त करूया!!!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *