Thu. Jul 18th, 2019

आपल्या लाडक्या बाप्पाला चॉकलेट मोदकाचा नैवेदय जरूर दाखवा.

0Shares

मोदक म्हंटले की, बाप्पांचा आवडता नैवैद्य. मग त्यात उकडीचे मोकद, तळलेले मोदक, हे आपण बनवतो. तुम्हाला माहिती आहे का? चॉकलेटचे मोदक ही बनतात. चॉकलेट तर सगळ्यांनाच आवडते. मग लहानांपासून ते मोठयापर्यंत सगळेच आवडीने चॉकलेट खातात. मग आता यंदाच्या गणपतीला चॉकलेट मोदक नक्की बनवून पाहा.

साहित्य:

खवा – ¼ कप

पिठी साखर – 2 टि.स्पून

कोको पावडर – 2 टि.स्पून

कृती:-

  • प्रथम एका कढईत खवा घ्या. नंतर खवा दिड मिनिटे तपकीरी रंगाचा होईपर्यंत गरम करा.
  • खवा थंड होऊ द्या. नंतर त्यात पिठी साखर घालून संपूर्ण मिश्रण एकत्र मिसळून घ्या.
  • त्यानंतर कोको पावडर घालून संपूर्ण मिश्रण ढवळून घ्या.
  • मिश्रण थोडे घट्ट झाले की, मोदकाच्या साच्यात घालून मोदक बनवून घ्या.
  • चॉकलेट मोदक करण्यासाठी आपण मिल्क चॉकलेट पण वापरू शकतो.

आशा पध्दतीने चॉकलेट मोदक तयार.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *