एकेकाळी सावळ्या रंगावरुन रेमोला अनेकांनी केलं होतं ट्रोल

भारतात आजही सुद्धा वर्णद्वेष होतो. रेमो डिसूझाने त्याच्या अनुभव सांगितले आहे. त्यांनी सांगितलं, कलाविश्वाच नाही, तर अगदी लहानपणापासून त्याला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला. असं रेमोने एका मुलाखती दरम्यान सांगितलं. “मी अगदी लहान असल्यापासून मला वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. लोक माझ्या रंगावरुन कायम मला चिडवायचे, माझ्या रंगावर भाष्य करायचे. मात्र, मी कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रित करत होतो. पण, आजही आपल्या देशात वर्णद्वेष केला जातो हे सत्य आहे”, असं रेमो म्हणाला.
कलाविश्वातील अनेक कलाकारांना वर्णद्वेषाचा त्रास सहन करावा लागला आहे. यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रा, राणी मुखर्जी, काजल मुखर्जी देवगण, ईशा गुप्ता, बिपाशा बासु, मलायका अरोरा यासारख्या अनेक कलाकारांना वर्णभेदाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे या वर्णभेदावर आधारित अनेक मालिका, चित्रपटांची देखील निर्मिती करण्यात आली आहे. रेमो डिसूझा कलाविश्वातील प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक आणि दिग्दर्शक आहे. रेमोने त्यांच्या परिश्रमच्या जोरावर कलाविश्वात नाव कमाविले आज तो प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहे. २०१३ मध्ये त्याचा ‘एबीसीडी’ हा डान्सवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्यानंतर त्याचा एबीसीडी 2 हा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. आज रेमोचं नाव बॉलिवूडमध्ये चांगल्या कलाकारमध्ये घेतल्या जाते.