Wed. Oct 27th, 2021

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

बनावट पासपोर्ट प्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसह चार जणांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 

दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोमवारी छोटा राजनसह चौघांना दोषी ठरवले.

 

दोषी ठरवलेले इतर तिघं जण पासपोर्ट कार्यालयाचे निवृत्त अधिकारी आहेत. 70 पैकी अधिक खटल्यात आरोपी असलेल्या छोटा राजनविरोधातील हे पहिलं प्रकरण आहे यावर कोर्टानं त्याला शिक्षा सुनावली.

 

छोटा राजननं सप्टेंबर 2003 मध्ये मोहन कुमार नावावर बनलेल्या बनावट पासपोर्ट आणि टूरिस्ट व्हिसावर भारतातून ऑस्ट्रेलियात पळ काढला होता.

 

तर, ऑक्टोबर 2015मध्ये छोटा राजनला इंडोनेशियन पोलिसांनी त्याला बालीमध्ये अटक करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *