Wed. Aug 4th, 2021

वाडियातील बाल रुग्णांनी अनुभवला ख्रिसमस सणाचा आनंद

मुंबई : बाई जेरबाई वाडिया हॉस्पीटल येथे बाल रुग्णांकरिता गुरुवारी २४ डिसेंबर रोजी ख्रिसमस सेलिब्रशन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. विविध प्रकारचे खेळ, कॅरल सिंगीग, बालनाट्य, खाऊ आणि भेटवस्तू अशा वातावरणात बाल रुग्णांनी ख्रिसमचा आनंद लूटला. खेळण्या बागडण्याच्या वयात विविध विकारांनी पिडीत कोमजलेले हे चेहरे आनंदाने खुलल्याचे दिसून आले. या बाल रुग्णांच्या मनोरंजनाकरिता हॉस्पीटलमधील डॉक्टर्स, रुग्ण, कर्मचारी देखील सहभागी झाले होते.

वाडिया रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला सांगतात, कोविड -१९ सारख्या महामारीने सर्वच देशांमध्ये संकट ओढावले आहे. अनेकांनी या आजारामुळे आपले प्राण गमावले आहेत. वाडिया हॉस्पिटलन सर्वच रुग्णांना या काळात मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला. तसेच साथीच्या आजाराला न घाबरता त्याचा सामना करण्याचे बळ देखील दिले. हॉस्पीटलमध्ये असलेले बाल रुग्णांच्या चेह-यावर हसू आणण्यासाठी तसेच त्यांना आजाराशी सामना करण्याची ताकद मिळावी याकरिता हॉस्पीटलच्या डॉक्टर्स तसेच इतर कर्मचा-यांनी या मुलांकरिता ख्रिसमस साजरा करण्याचे ठरवले. कोविड १९ च्या नियमांचे पालन करत मुले आणि हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांनी या दिवसाचा आनंद लुटला. रुग्णांनी स्वतः ख्रिसमस ट्री सजविली, कॅरोल गायले तसेच मोठया उत्साहात या उपक्रमात आपला सहभाग दर्शवीला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *