Sun. Jan 16th, 2022

रायगडमध्येही नाताळची धामधूम

नाताळ सण म्हटला की ख्रिश्चन धर्मियांमध्ये एक उत्साहाचे वातावरण निर्माण होते. ख्रिश्चन धर्मियांचा महत्वपुर्ण सण म्हणजे येशूच्या जन्माचा सोहळा अर्थात नाताळच्या सण.

मंगळवारी मध्यरात्री चर्चमध्ये धार्मिक प्रार्थनेनंतर नाताळ सणाला सुरूवात झाली. संपूर्ण देशात नाताळ मोठ्या उत्साहात पार पडतो.

त्यामध्ये करण्यात येणारी विद्यूत रोषणाईने सर्वाचे लक्ष वेधले जाते.

महाराष्ट्रातील रायगडमध्ये ही दरवर्षीप्रमाणे नाताळ साजरा करण्यात आला.

रात्री चर्चमध्ये ख्रिश्चन बांधव – भगिनी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तेथे त्यांनी सामूहिक प्रार्थना केली. त्यानंतर चर्चमध्ये येशूच्या जन्माचा सोहळा पार पडला. यावेळी छोटे-मोठे ख्रिसमस ट्री सजवण्यात आले होते.

 सर्वांनी नाताळ निमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. सणाच्या निमित्ताने ख्रिश्चन बांधवांनी घराबाहेर चांदणी लावून रोषणाई केली आहे. येशुच्या जन्माचे देखावे देखील ठिकठिकाणी साकारण्यात आले आहे.

तसेच रायगडबरोबरच अलिबाग, कोर्लई, नागोठणे याठिकाणीही मोठ्या आनंदात पार पाडण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *