Tue. Mar 31st, 2020

‘CID’ मधील दया, फ्रेडी, अभिजितसोबत ‘गडबड’!

भारतीय टीव्ही जगतात सर्वाधिक काळ चाललेली मालिका म्हणजे CID. 1998 साली सुरू झालेल्या मालिकेने तब्बल 21 वर्षांनी प्रेक्षकांचा निरोप घेतला. तरीही प्रेक्षकांना ही मालिका पाहण्याची इच्छा कमी झाली नाही. मात्र मोठमोठे गुन्हे एक-दोन भागांमध्ये सोडवून दाखवणाऱ्या या सिरीयलमधील कलाकारांचीच फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.

CID मालिकेतील एसीपी प्रद्युम्न, इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेडी, डॉ. साळुंखे ही पात्रं प्रेक्षकांच्या मनात अनेक वर्षं ठाण मांडून बसली. 2018 मध्ये ही मालिका संपूनदेखील लोकांना ती पाहण्याची उत्सुकता होती. त्यामुळे CID च्याच कलाकारांना घेऊन CID सारखीच मालिका बनवण्याचा विचार निर्मात्यांनी केला.

‘CIF’ या नावाने ही मालिका सुरू करण्याचा घाट घालून या इन्स्पेक्टर अभिजीत, दया, फ्रेडी यांना घेऊन चित्रिकरणही सुरू झालं.

मात्र त्यानंतर 6 ते 7 महिने उलटूनदेखील कलाकारांना पैसेच न दिल्यामुळे अखेर आपली फसवणूक झाल्याचं यातील कलाकारांच्या लक्षात आलं.

अभिनेते दयाची भूमिका साकारणरा दयानंद शेट्टी, इन्स्पेक्टर अभिजितची भूमिका साकारणारा आदित्य श्रीवास्तव, फ्रेडीची भूमिका निभावणारा दिनेश फडणीस या कलाकारांनी निर्मात्यांविरोधात Cine and TV Artists’ Association (CINTAA) मध्ये तक्रार केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *