Thu. Jul 18th, 2019

साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण ‘निनावं’ पदार्थ, तुम्हीही नक्की करून पाहा…

0Shares

श्रावण संपताच दाटा येतो आणि सीकेपी सुगरणी निनावं करायच्या तयारीला लागतात. निनावं म्हणजे फक्त सीकेप्यांच्या स्वयंपाक घरातला गोड पदार्थ नाहीये, निनावं म्हणजे आपल्या पाककलेचा आणि पाहुणचाराचा गोडवाच जणू. 

सीकेप्यांचं ‘निनावं’ हा नाव नसलेला गोड पदार्थ तुम्हाला नक्कीच आवडेल.साध्या मिश्रणातून बनलेला हा असाधारण पदार्थ. कृती पण अतिशय सोप्पी. कृती पण अतिशय सोप्पी. 

असे बनवतात निनावं – 

  • प्रथम दोन पेले बेसन व त्यात सुमारे चार टेबलस्पून येवढी कणीक घेऊन हे मिश्रण साजुक तुपावर खरपूस भाजून घ्यावे.
  • नंतर हे मिश्रण तेवढ्याच मापाच्या नारळाच्या दुधात मिक्स करावे.
  • तेवढ्याच प्रमाणात गूळ घेऊन हे सर्व मिश्रण मिक्सर मधून फिरवून त्याती गुठळ्या काढून टाकाव्यात.
  • या मिश्रणात स्वादानुसार जायफळ पूड घालावी.
  • हे सर्व मिश्रण मध्यम आचेवर पिठल्यासारखे घट्ट होईपर्यंत ढवळत रहावे.
  • घट्टपणा आल्यावर मंद आचेवर शिजत ठेवावे.
  • थोड्या वेळाने चाकूच्या सहाय्याने ते योग्य प्रमाणात घट्ट (खटखटीत) झाले आहे हे तपासून मग आच बंद करावी.
  • वरुन बदाम, काजू, पिस्ते असे पसरवून सजवावे व थंड झाल्यावर सर्व्ह करावे. ही खास सीकेपी खासियत असलेली रेसिपी आहे

तुम्ही जरुर करुन बघा आणि खाऊन नक्की मेसेज करा कसं वाटलं ते?

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *