Jaimaharashtra news

उत्तर प्रदेशमध्ये बिर्याणीसाठी काँग्रेस समर्थकांमध्ये हाणामारी

निवडणुका तोंडावर आल्याने उमेदवारांचा प्रचारही जोरात सुरू झाला आहे. पण या प्रचारादरम्याम कुठे काय घडेल हे सांगता येणार नाही. असाच एक किस्सा काँग्रेसचे उमेदवार नसीमुद्दीन सिद्दीकी यांच्या प्रचारादरम्यान घडला आहे. या प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आखला होता. पण त्यांच्याच समर्थकांमध्ये बिर्याणी खाण्यावरून जोरदार बाचाबाची झाली.त्यांच्याच समर्थकांमध्ये अशा कारणावरून वाद झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं ?

बिजनौर मतदारसंघातील टडहेडा येथे शनिवारी माजी आमदार मौलाना जमील यांच्या घरी प्रचार सभा होती.

प्रचारादरम्यान समर्थकांना बिर्याणी खाऊ घालण्याचा बेत नसीमुद्दीन सिद्दीकी यांनी आखला होता.

पण बिर्याणी घेण्यावरून  समर्थकांमध्ये हाणामारी झाली.त्यात अनेक जण जखमी झाले.

या प्रकरणी 34  जणांविरोधात गुन्हा नोंदवला असून, आतापर्यंत 9 जणांना अटक केलं आहे.

त्यांच्याच समर्थकांमध्ये अशा कारणावरून वाद झाल्याने याची सर्वत्र चर्चा होत आहे.

 

Exit mobile version