Sat. May 15th, 2021

प. बंगालमध्ये मतदानावेळी तणाव, केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीवर दगडफेक

लोकसभेच्या चौथ्या टप्यात उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिमबंगाल, महाराष्ट्र, झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, राजस्थान, जम्मू-कश्मीरसमवेत 9 राज्यात 71 जांगावर मतदान होत आहे. चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रात उर्वरित 17 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे. यात मुंबईतील सर्व सहा मतदारसंघांचा समावेश असणार आहे. पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. प्रक्षुब्ध जमावाने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीचार्च केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

नेमके प्रकरण काय?

चौथ्या टप्प्यातील ८ जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे.

मतदान सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाली असल्याची बातमी सगळीकडे पसरली.

यामुळे टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली.

भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांमध्ये यावरुन वाद सुरू झाला आणि वादाचे रुपांतर मारामारीत झाले.

केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो घटनास्थळी आल्यानंतर त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

मोठ्या जमावाने बाबुल सुप्रियो यांच्यावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला.

यामध्ये सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फुटल्या आणि गाडीचे नुकसान झालं आहे.

या सर्व प्रकारावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांना लाठीचार्ज करावा लागला.

यावेळी मतदारांनीही काठ्या घेऊन पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

या प्रकारामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *