Sun. Aug 7th, 2022

मागील काही महिन्यांपासून मुंबईत वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामावरील बंदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उठवली आहे. तांत्रिक बाब पूर्ण झाल्यामुळे आता कारशेडचं काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने आरेतील कारशेडवरील बंदी उठवली असल्याने मुंबईकर आणि पर्यावरणवाद्यांकडून अधिक आक्रमक आंदोलन केले जाणार असल्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारने सत्तेत असताना कारशेडच्या या प्रकल्पावर स्थगिती आणली होती. त्यामुळे मागच्या अडीच वर्षापासून कारशेडचे काम बंद होते. आता ही बंदी उठवल्याने उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यावर हा प्रकल्प सुरू होणार अशा चर्चा चालू होत्या.मुंबईतील आरे जंगलात मेट्रो कारशेडला पर्यावरणवाद्यांनी विरोध केला होता. मेट्रो कारशेड हे इतरत्र ठिकाणी तयार करण्याची मागणी करण्यात आली होती. मेट्रो कारशेडच्या प्रस्तावित ठिकाणी बिबट्यांचा अधिवास असून जैवविविधता असल्याचे पर्यावरणवाद्यांनी म्हटले होते. आरेमधील बांधकामामुळे जंगलच नव्हे तर इथे असलेल्या जैवविविधतेवरही परिणाम होणार असल्याचा दावा करण्यात येत आहे.

शिंदे सरकार सत्तेत आल्यावर आदित्य ठाकरे यांनी ‘आरे जंगल वाचवा मोहिम’ काढली होती. या आंदोलनावेळी त्यांनी सरकारवर निशाणा साधला होता. या आंदोलनानंतरही काही पर्यावरणप्रेमींकडून पुन्हा आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत हा निर्णय मागे घेतला जात नाही तोपर्यंत प्रत्येक रविवारी आंदोलन केले जाणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आले होते. मेट्रो ३ कारशेड आरेमध्ये उभारण्यास शिवसेनेने सुरुवातीपासून विरोध दर्शवला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्याबरोबर आरेतील कारशेड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. कारशेड आरेतून कांजूरमार्गला हलवण्याचा निर्णय देखील घेण्यात आला होता. मात्र, आरेमध्येच कारशेड उभारण्यात यावे, अशी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांची इच्छा होती. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे.

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्रीवर बैठक पार पडली . या झालेल्या बैठकी नंतर माध्यमांशी संवाद साधला .या बैठकीत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी नवीन विविध प्रकारचे निर्णय घेतले . सार्वजनिक गणेशोत्सव, मोहरम, दहीहंडी निमित्त कायदा आणि सुव्यवस्था आणि इतर समस्यांसंदर्भात या बैठकीत निर्णय झाले याशिवाय कोरोना निर्बंधाच्या विघ्नात अडकलेला गणेशोत्सवही धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे .तसेच अशा विविध विषयांवर चर्चा करताना ‘मेट्रोचं काम वेगाने पूर्ण झालं तर मुंबईकर सुखावतील’ तसेच मेट्रोला उशीर म्हणजे मुंबईकरांच्या जीवाशी खेळ असे उपमुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.