महापरीक्षा पोर्टल बंद करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा

कोल्हापूर : महापरीक्षा पोर्टल बद्दल राज्यभरातून विरोध केला जात आहे. कोल्हापुरात आज महापरीक्षा पोर्टल बदं करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. कोल्हापूर जिल्हा स्पर्धा परीक्षा विद्यार्थी कृती समितीच्यावतीने हा मोर्चा काढण्यात आला होता.

या मोर्च्याची दसरा चौकातून सुरूवात होऊन व्हीनस कॉर्नर एसेंबली रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी विद्यार्थ्यांनी महापरीक्षा पोर्टल विरोधात जोरदार घोषणा दिल्या.

काय होती मागणी ?

महापरीक्षा पोर्टल बंद करण्यात यावं. पदभरती लवकर सुरू करावी तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत करावी. गट ब आणि क संयुक्त पूर्व परीक्षा पद्धतीने न घेता, आधीप्रमाणे विभक्त पूर्व परीक्षा पद्धतीनं घ्यावी. पोलीस शिपाईसाठी आधीप्रमाणेच मैदानी मग नंतर लेखी परीक्षा घेण्यात यावी. अशा मागण्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आल्या.

दरम्यान काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी महापरीक्षा पोर्टलमधील त्रुटी दूर होईपर्यंत परीक्षांना स्थगिती दिली आहे.

Exit mobile version