Mon. Jan 24th, 2022

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप कार्यक्रम

नाशिकमध्ये होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज रविवारी कुसुमाग्रजनगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी येथे मोठ्या दिमाखात समारोप होत आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, ज्येष्ठ साहित्यिक नरेंद्र चपळगावकर यांची विशेष उपस्थिती आहे.

साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी कोरोना बळींना श्रद्धांजली वाहिली. तसेच मराठी भाषेला अभिजात भाषा दर्जा मिळावा, राज्य सरकारच्या प्रस्तावावर केंद्र सरकारने त्वरित निर्णय घ्यावा, अशी मागणी छगन भुजबळांनी केली. यावेळी भुजबळांनी मराठी भाषेवर लक्ष्य केले. ते म्हणाले, मराठी भाषिक शाळा बंद पडत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने उदासीनता झटकून, सकारात्मक प्रतिसाद करून शाळा सुरू करण्याची मागणी भुजबळांनी केली आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे गंभीर परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारने या वैफल्यग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करावी, साहित्यिकही सर्वतोपरी मदत करणार असल्याचे भुजबळ म्हणाले. तसेच भाषाविषयक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने स्वतंत्र मराठी विभाग स्थापन करावा अशी मागणी भुजबळांनी केली. कर्नाटक सरकार मराठीची गळचेपी करत आहे, त्यांच्या धोरणाचा हे सम्मेलन निषेध करीत आहे, असेही भुजबळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *