Mon. Sep 20th, 2021

मुंबईत ढगाळ वातावरण; आजही पावसाचा अंदाज

मुंबई : राज्यात चक्रीवादळामुळे फार नुकसान झालं मुंबईत अनेक ठिकाणी झाड पडलं. विजेचे खांब पडले त्यामुळे अनेक ठिकाणी वीज गेली. अनेकजणाना काही काळ अंधारात राहवं लागलं चक्रीवादळामुळे मुंबईत लोकल, मोनोरेल ही सेवा बंद होती. यामुळे सर्वसामन्याना अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता. मुंबईतून चक्रीवादळ निघाल्यानंतर गुजरात आणि राजस्थानच्या वाटेने निघाले. मुंबईत तौक्ते वादळाचा परिणाम अजूनही शहरात जाणवत आहे. मुंबईत ढगाळ वातावरण अजूनही आहे. हे वातावरण असेच राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यताही विभागाने वर्तविली आहे. रस्ते आणि रेलवे वाहतूक सुरळीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच दिवसभर शहरात थंड वारे वाहतील. काही ठिकाणी मोठा पाऊस पडण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. याशिवाय आज सायंकाळी 5.32 वाजता समुद्राला भरती येणार आहे. ही भरती 3.7 मीटरची असेल, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान शहरातील रस्ते आणि रेलवे वाहतूक सुरळीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *