Thu. Jun 17th, 2021

राज्यात दुपारी कडक ऊन तर संध्याकाळी पाऊस

यंदा मॉन्सून सामान्य राहील असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. यामुळे थोडा शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. मात्र सध्या महाराष्ट्रात दिवसभर सर्वत्र उन्हाचा कडक ऊन आणि संध्याकाळी पावसाचे वातावरण आणि हवेच्या सोसाट्या निर्माण होत असल्याचं दिसत आहे. राज्यातले हवामान 10 मे तारखेपर्यंत बदल होण्याची शक्यता नसल्याचं हवामान विभागाने कळवले आहे. काल संध्याकाळी मराठवाडा, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात काही ठिकाणी तर विदर्भ आणि उत्तर कोकणात तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरींनी हजेरी लावली.

राज्यातील अनेक ठिकाणी आजही असाच पाऊस अपेक्षित आहे. काल रोहित पवार यांनी माहिती दिलेल्या माहितीनुसार, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी 6 ते 11 मे दरम्यान वादळी वारे आणि गारपिटीसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची, तर कर्जत-जामखेडमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुले शेतकऱ्यांनी पिकांची आणि जनावरांची काळजी घ्यावी. दुपारी उन्हाचा कडाका वाढत आहे त्यामुळे संध्याकाळी पाऊस बरसत आहे. विदर्भ, मराठवाडा खान्देशात बहुतांश ठिकाणी पारा 40 अंशांच्या पुढेच आहे. काल राज्यातले सर्वाधिक 43 पुर्णांक 4 दशांश अंश सेल्सीअस तापमान अकोल्यात नोंदवले गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *