Tue. Sep 28th, 2021

वाघ-सिंह एकत्र आले, की राज्य कोण करणार असा प्रश्न उरत नाही- मुख्यमंत्री

शिवसेनेच्या 53व्या वर्धापनदिनानिमित्त प्रथमच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेच्या मंचावरून आपलं मनोगत व्यक्त केलं. आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आपले मोठे बंधून असा केला. तसंच दोन भावांमध्ये तणाव असतो, मात्र ते वेगळे होत नाहीत, तसंच आमच्यात काही तणाव असले, तरी आम्ही एकत्रच आहोत अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री जाणार का, असा प्रश्न सर्वांना पडत होता. मात्र आमंत्रित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पडला नाही आणि आमंत्रण स्वीकारताना मलाही पडला नाही, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. आम्ही कायम एकत्रच आहोत. जेव्हा वाघ-सिंह एकत्र येतात, तेव्हा जंगलावर राज्य कुणाचं हे सांगावं लागत नाही. तसंच कितीही पक्ष आमच्याविरोधात आले तरी फरक पडत नाही, विजय आमचाच होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भगवा ध्वज माझा गुरू- मुख्यमंत्री

या कार्यक्रमाला मी आलो ते बाळासाहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, उद्धव यांचे प्रेम घेण्यासाठी आणि शिवसैनिकांची ऊर्जा घेण्यासाठी, असं मुख्यमंत्र्य़ांनी स्पष्ट केलं.

शिवसेनाच्या कार्यक्रमामध्ये आल्यावर वेगळ्या ठिकाणी गेल्याचं कधी जाणवत नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.

माझी सुरुवात RSS मधून झाली आहे, भगवा झेंडा माझा गुरू आहे. पहिली गुरूदक्षिणा या ध्वजालाच आपण अर्पण केल्याची आठवण त्यांनी सांगितली.

बाळासाहेब ठाकरे यांचं हिंदुत्व हे व्यापक होतं. आमचं हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व आहे असं मुख्यमंत्री म्हणाले.

 

पुढच्या पिढीला दुष्काळ पाहावा लागणार नाही!

पुढच्या पिढीला दुष्काळ बघावा लागणार नाही, असं युती सरकार कार्य करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विशेषकरुन मराठवाडा आणि विदर्भाला दुष्काळ मुक्त करायचे आहे, असं मुख्यमंत्री आपल्य़ा भाषणात म्हणाले.

 

उद्धव ठाकरे आणि मी योग्य निर्णय घेतले आहे, योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ

उद्धव ठाकरे आणि मी योग्य निर्णय घेतले आहे, योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ असं सूचक विधानही मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात केलं.

आपली युती ही महाराष्ट्राच्या भल्यासाठी असल्याचं ते म्हणाले.

एका पक्षाच्या वर्धापन दिनाला दुसऱ्या पक्षाच्या प्रमुख व्यक्तीला बोलवण्याचं विरळा असणारं उदाहरण आज घडलं, या ऐतिहासिक घटनेचे आपण साक्षी असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *