Sun. Apr 21st, 2019

#IndiaElections2019 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बजावला मतदानाचा हक्क

166Shares

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली असून नागपूरमध्ये सकाळी मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाना पटोले यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आईसह मतदान केले. तसेच मतदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मतदान करण्याचे आवाहनही दिले आहे.

मतदान केल्यावर मुख्यमंत्री काय म्हणाले ?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी आणि आईसह मतदान केले.

नागपूरच्या मतदार केंद्रात जाऊन त्यांनी मतदान केले.

मतदान केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मतदान करावे असे आवाहन केले.

मजबूत सरकारासाठी भारतीयांनी मतदान केले पाहिजे.

यापूर्वी नितीन गडकरी, नाना पटोले यांनी मतदान केले.

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा –

सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे.

देशातील 20 राज्यांमधील 91 मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे.

महाराष्ट्रात 7 मतदारसंघात मतदान सुरू आहे.

विदर्भातील नागपूर, रामटेक, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशीम आणि वर्धा मतदारसंघात मतदान सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *