Mon. Jan 17th, 2022

५६ पक्षांच्या विश्वासावर देश चालत नाही – मुख्यमंत्री फडणवीस

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. आज भाजप- सेनेने कोल्हापूरमध्ये महायुतीचा महामेळावा आयोजीत केला होता. या मेळाव्यासाठी जनतेने प्रचंड गर्दी केली होती.  कोल्हापूरातील जनतेचा प्रतिसाद बघत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील अरबी महासागाराशी त्याची तुलना केली आहे. तसेच विरोधाकांवर खरमरीत टीकाही केली आहे.

महामेळाव्यात मुख्यमंत्री काय म्हणाले ?

कोल्हापूर आमचं शक्तिपीठ.

केवळ नावामुळे राष्ट्रवाद येत नाही तर मनात राष्ट्रवाद हवा.

गरिबी जनतेची नाही कॉंग्रेसची मिटली.

कॅप्टनची माढामधून माघार असं म्हणत शरद पवारांवर टीका केली.

देश चालवायला ५६ इंचाची छाती लागते,  ५६ पक्षाच्या विश्वासावर देश चालत नाही.

१५ वर्षापेक्षा ५ वर्षात जास्त कामं पार पाडली आहेत.

कोही लोकं स्वत: बोलू शकत नसल्यानं पोपट नेमलेय आहेत असं म्हणत राज ठाकरेंवर टीका.

पश्चिम महाराष्ट्रावर, विदर्भावर अन्याय केला नाही.

दोन पक्षांमधली नाही तर दोन विचारधारांमधली आगामी निवडणूक आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *