महिलांना बिनव्याजी कर्ज पुरवणार, मुख्यमंत्र्यांचं औरंगाबाद येथे आश्वासन

औरंगाबाद येथे अतिमहत्त्वाच्या ऑरिक सिटीच्या लोकार्पणासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी औरंगाबाद येथे दाखल झाले. या कार्यक्रमाच्या वेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान यांच्या अफाट ऊर्जेचं कौतुक करत कार्यमग्नतेमुळे सलग दोन रात्री जागरण करूनही औरंगाबद मध्ये उपस्थित राहिल्याबद्दल आभार व्यक्त केले.
काय म्हणाले भाषणात मुख्यमंत्री?
दिल्ली – मुंबई कॉरिडॉरच्या ऑरिक सिटीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होतंय. आजचा दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील औद्योगिक क्रांतीचा दिवस म्हणून गणला जाईल.
महाराष्ट्रात औरंगबाद -जालना उद्याोगाचे मेग्नेट असणार आहे.
औरंगाबादचे ऑटो क्लस्टर देशात महत्वाचे आहे.
समृद्धी महामार्गामुळे JNPT बंदर 4 तासांवर असेल.
मराठवाड्यात येण्यासाठी अनेक कंपन्या उत्सुक आहेत.
64 हजार किलोमीटर पाईपलाईनचं काम होणार आहे.
पुढील पाच वर्षं पाण्यावर काम करणार
मराठवाडा दुष्काळमुक्त करणार
मराठवाडा वॉटर ग्रीड काम सुरू केलं आहे.
‘जलयुक्त शिवार’ अंतर्गत अनेक कामं केली. कोकणातून मराठवाड्यात पाणी आणणार
औरंगबाद जालना निविदा काढण्यात आल्या आहेत. या माध्यमातून फिल्टरचे पाणी मिळणार आहे
उद्याोगपार्क मध्ये महिला बचत गटासाठी जागा राखीव ठेवणार आहे.
काही उद्योजक कर्ज फेडत नाहीत पण महिला बचत गट 100 टक्के कर्ज फेडतात
म्हणून महिलांकरता बिनव्याजी कर्ज देणार