Jaimaharashtra news

विरोधक अभ्यास करत नाहीत, म्हणून नापास होतात- मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा दुसरा टप्पा सुरू आहे. यादरम्यान त्यांनी भुसावळ येथे आज त्यांनी पत्रकार परिषद घेतली.  भाजपकडे विकासाचं रसायन आहे, असं म्हणत त्यांनी विरोधकांना 5 वर्षांत सूरच सापडला नसल्याची टीका केली. आधी मोदींजींना शिव्या, आता EVM ला शिव्या विरोधक देत आहेत. ते अभ्यास करत नाही म्हणून परीक्षेत नापास होतात, असं विरोधकांच्या कामगिरीचं विश्लेषण मुख्यमंत्र्यांनी केलं.

गेल्या 13 दिवसांत 50 मतदारसंघांतील मतदारांशी संवाद साधल्याचं सांगतानाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडला. तसंच भावी धोरणांबद्दलही सुतोवाच केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

नार-पार प्रकल्पात 13 धरणं बांधण्यात येणार

उत्तर महाराष्ट्रातील सर्व सिंचन प्रश्न सुटणार

भुसावळात रेल्वे कारखाना आणी दिपनगर केंद्र विस्तार केला

लोकांची कामं केली म्हणून गेल्या 5 वर्षातील सर्व निवडणुकीत भाजप राज्यात क्रमांक 1 पक्ष झाला.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा मोठा निर्णय

उद्योग,व्यापार आणी सामान्य ग्राहक यांना फायदा होणारा निर्णय

रेपो रेट रिडक्शन गेल्या 2 महिन्यात RBI नं केला

याचा फायदा सामान्य ग्राहकाला होणार आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदी दूर होणार आहे

कंझ्युमर गुड्सची मागणी वाढेल.

पीक विमा देणाऱ्या कंपन्यांचा नफा 40 ते 50 टक्क्यांच्या वर

ग्राहक रिस्क विकत घेतो. मात्र,क्लेम करत नाही

गेल्या वर्षात 468 कोटी शेतकऱ्यांनी भरले

18200 कोटींचा विमा शेतकऱ्यांती उतरवला

शेतकऱ्यांना 3255 कोटींचा क्लेम मिळाला

ज्या शेतकऱ्यांना टेक्निकल कारणांमुळे विमा मिळाला नाही त्यांना विमा मिळवून देणार

मुख्यमंत्र्यांनी यावेळी उपरोधिक पद्धतीने सुप्रिया सुळे यांचे आभार मानले.

त्यांच्या पक्षात भ्रष्टाचाराची घाण झाली आहे, हे त्यांनी मान्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले.

तसंच आमच्याकडे वॉशिंग पावडर नाही तर डॅशिंग नेतृत्व आहे, असं त्यांनी म्हटलं. आमच्या मेगाभरतीची काळजी करु नका, आत्मचिंतन करा असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

Exit mobile version