Tue. Apr 7th, 2020

अडेल भूमिका घेणाऱ्या दुध संघांवर कारवाई करणार – मुख्यमंत्री

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

सरकारनं 27 रुपये प्रति लीटर दुधाचा दर ठरवलाय, ठरवलेला दर लागू करावा अन्यथा अडेल भूमिका घेणाऱ्यांवर कारवाई करणार, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दूध महासंघांना दिले आहेत. दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे ही वस्तूस्थिती आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात साखर आणि दूध पावडरचे दर कोसळल्यानं त्याचा हा परिणाम होत आहे, तरी देखील शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देण्याची नोटीस आम्ही दूध संघांना पाठवल्याचं मुख्यमंत्री म्हणाले असून दूधाला 27 रुपये प्रति लीटर दर द्यावा.

या मागणीसाठी राज्यात ठिक-ठिकाणी दूध उत्पादक शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. शेतकरी मोफत दूध वाटत सरकारचा निषेध करत आहेत. सरकारनं जाहीर केलेल्या दराची अंमलबजावणी व्हावी यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे, दरम्यान सरकारनं ठरवलेला दर लागू करा, अन्यथा अडेल भूमिका घेणाऱ्या दुध संघावर कारवाई करा, असे आदेश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *