Mon. Aug 8th, 2022

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूरग्रस्तांसाठी मोठ्या घोषणा

कोल्हापूर सांगली सातारा कोकण नाशिक भागात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीसंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली. आज काही निर्णय घेण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन घोषणा केल्या.

काय केल्या मुख्यमंत्र्यांच्या घोषणा?

एक हॅकटर पर्यंत ज्यांनी पीक घेतलंय तेवढं कर्ज माफ राज्य सरकार चा निर्णय

ज्यांनी कर्ज घेतले नाही अश्या शेतकऱयांना नुकसानभरपाई च्या तीन पट नुकसानभरपाई मिळणार

जी घरं पडली आहेत त्यांना ‘प्रधानमंत्री आवास योजने’तून केंद्र सरकारकडून मदतीबरोबर 1 लाख रुपये दे

तात्पुरते राहण्यासाठी ग्रामीण भागात 24 हजार भाडे तर 36 हजार शहरी भागात देणार.

अडीच एकर शेतीवर घेतलेलं पीककर्ज माफ करण्यात येणार आहे.

5 ब्रास वाळू मोफत दिली जाईल.

तीन महिन्यांपर्यंत धान्य मोफत देण्यात येईल.

जनावरांच्या गोठ्यासाठी आर्थिक मदत मिळेल.

इन्कम टॅक्ससाठी मुदत वाढवण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार आहे.

कृषी पंपाच्या वीज बिलाची वसुली तीन महिन्यांसाठी स्थगित करण्यात येणार आहे.

साफ सफाईचे काम युद्धपातळीवर सुरू आहे रोगराई पसरू नये या साठी काळजी घेतली जात आहे

दोन हजार घरांच्या पेक्षा अधिक घरांची पडझड झाली आहे. पुनर्वसन करण्यासाठी सरकार जमीन देणार आहे.

पूरग्रस्त भागातील जी कागदपत्रे गहाळ झाली आहेत त्यांना मोफत कागदपत्रे दिली जाणार

राज ठाकरेंना पाठवलेली नोटीस सूडबुद्धीने नाही- मुख्यमंत्री

राज ठाकरे यांना सक्तवसुली संचलनालयाकडून बजावण्यात आलेल्या नोटिशीबद्दल मुख्यमंत्र्यांना विचारलं असता आपल्यालाही याबद्दल काही माहिती नाही असं उत्तर त्यांनी दिलं. ED स्वतंत्रपणे काम करतं. भाजपने सूडबुद्धीने कारवई केलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं. तसंच राज ठाकरे यांची काही चूक नसेल, तर घाबरायची गरज नाही, त्यांची सुखरूप सुटका होईल असंही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.