मी मुख्यमंत्री होणार याबद्दल पत्रकारांना शंकाय का?- मुख्यमंत्री

आज नागपूर येथे होणाऱ्या महाजनादेश यात्रेपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आपण विदर्भासाठी 5 वर्षात भरपूर काम केलं असल्याचं म्हणत आपल्या विदर्भातील कामाचा लेखाजोखा पत्रकारांसमोर त्यांनी मांडला. तसंच मी पुन्हा मुख्यमंत्री होणार याबद्दल तुमच्या मनात शंका आहे का असा सवालही त्यांनी पत्रकारांना केला.
महाजनादेश यात्रेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. जनादेशाचा उपयोग काय केला हे सांगण्यासाठी या यात्रेचं आयोजन केलं आहे, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
विदर्भातील कामासंदर्भात काय म्हणाले मुख्यमंत्री?
विदर्भातील विषयांवर गुणात्मक परिवर्तन झालं.
विदर्भातील 90 टक्के सिंचनाचे भूसंपादन पूर्ण केलं.
20 वर्ष न होऊ शकलेले प्रोजेक्ट पूर्णत्वास नेले.
सिंचनाचा अनुशेष भरून काढला.
बाजूच्या राज्याच्या तुलनेत वीज स्वस्त आहे, विदर्भात मोठ्या प्रमाणात उद्योग आले.
महाजनादेश यात्रा BJP ची असली तरी महायुतीला निवडून द्या असं म्हणतोय.
OBC आरक्षणावर काय म्हणाले CM?
राज्यातील 34 जिल्हा परिषदेत 90 ते 95 जागा OBC च्या कमी होणार होत्या.
OBC समाजाच्या कमी होणाऱ्या जागा कायदा बनवून आम्ही वाचविल्या.
OBC च्या जागांवर कुठलाही घाला आमचं सरकार घालणार नाही.
देशातील पहिले राज्य ज्यामध्ये प्रपोर्शनल रिझर्व्हेशन देतंय.
विरोधकांना टोला
आम्ही नागरिकांशी संवाद करतोय, विरोधीपक्ष EVM सोबत संवाद साधत आहेत.
Evm मशीन आहे ती मत देत नाही, मत मतदार देतात.
अतिशय हताश, निराशाजनक विरोधीपक्ष कधी बघितला नाही,
पराभवानंतर जनतेशी नाळ तोडणं हे लोकशाहीला चांगलं नाही.