Tue. Jun 28th, 2022

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादी वर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता सभांना लवकरच पूर्णविराम लागणार आहे. याच धर्तीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये आहेत. नाशिकच्या अनंत कान्हेरे मैदानावर आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेतली. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारासाठी ही आजची अखेरची सभा पार पडली. काल याच ठिकाणी राज ठाकरे यांची देखील सभा झाली होती, तेव्हा त्याच भूमीमध्ये आता मुख्यमंत्री काय बोलणार साकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राज ठाकरेंच्या मोदींविरोधात चाललेल्या प्रचार मोहीमेवर मुख्यमंत्र्यांनी काही लोकांना कावीळ झाली आहे, म्हणून प्रत्येक ठिकाणी मोदी आणि शहा दिसत आहेत, असे म्हणत राज ठाकरेंना टोला लगावला आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री ?

ऊन तापतंय हे मला माहित आहे, आणि येणाऱ्या काळात सूर्यनारायण राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाची राख रोंगोळी करेल ,असं म्हणत त्यांनी भाषणाला सुरूवात केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणजे 100 सोनार की एक लोहार की आहे. हे लवकरचं कळेल.

काही लोकांना कावीळ झालेली आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना मोदी आणि शहा दिसत आहेत,

असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लगावला.

काँग्रेस-राष्ट्रवादीला मत म्हणजे पाकिस्तानला मत असल्याचे ते यावेळी म्हणाले.

महंमद अली जीना यांनी हा देश घडवला असं शत्रुघ्न सिन्हा यांनी म्हटलं  तेव्हा त्यांना लाज वाटायला हवी.

ममता बॅनर्जीची भाषा पाकिस्तान आणी बांगलादेशच्या बाजूने आहे.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका

यावेळी त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला राष्ट्रविरोधी म्हटले आहे.

हा जाहीरनामा दहशतवादी आणी पाकिस्तान यांची बाजू घेणारा तर राष्ट्रद्रोहाला समर्थन देणारा आहे.

आत्तापर्यंत तीन टप्प्याचे मतदान झाले आहे, चौथ्या टप्यात मतदान होणार आहे, पहिल्या तीन टप्प्यात झालेल्या निवडणुकीत आघाडीची पत्ता साफ झालंय, असे त्यांचे म्हणणे आहे.

राज ठाकरेंचा दुकान नोट बंदी मुळे बंद पडल्याने हा खटाटोप सुरू आहे राज ठाकरेंवर घणाघाती टीका केली.

इंजिन हलत नाही,चालत नाही,डुलत नाही अशी अवस्था आता राष्ट्रवादीची होणार आहे

“तुम्ही जर विकास केला असता, तर नाशिकची जनता तुम्हाला घरी का पाठवेल” म्हणाले.

ऱाज ठाकरे यांच्या कार्यक्षमतेवर निशाणा साधला.

सरकारच्या माध्यमातून नाशिकचा विकास

नाशिक मध्ये झालेली कामांना आधीच पैसे दिले होते, कुंभमेळा मुळे निधी मिळालं

राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही निधी आणला म्हणून नाशिकचा विकास झाला.

गेल्या दोन वर्षापासून नाशिक मध्ये 2 हजार कोटींचे काम सुरू आहे.

भुजबळांनी भ्रष्टाचार केला, तिजोऱ्या लुटल्या म्हणून जेलमध्ये टाकलं.

अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला.

लवकरच त्यांच्यावर खटला सुरू होणार आहे, न्यायदेवताच त्यांच्या करतुतींचा करणार फैसला करेल, असं ते म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.