Thu. Jun 17th, 2021

खुद्द मुख्यमंत्र्यांचा बंगला डिफॉल्टर यादीत, ‘या’ मंत्र्यांनी थकवली 8 कोटींची पाणी बिलं?

सामान्य मुंबईकर जर दोन ते तीन महिन्यात जास्त पाण्याची थकबाकी ठेवली तर बृहन्मुंबई महानगरपालिका तुमची जलजोडणी खंडित करते, परंतु महानगरपालिका मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर महेरबान आहे. कारण मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. तसेच सदर बंगल्याला पालिकेने डिफॉल्टर यादीत टाकले आहे.

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई महानगरपालिके कडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मांगावली होती. सदर माहिती संदर्भात जन माहिती अधिकरी तथा कार्यकारी अभियंता जलमापके (महसूल) यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे.यामाहितीत मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याच्या एकूण 8 कोटींची थकबाकी आहे. तसेच इतर मंत्र्यांच्या शासकीय आवासावर पाण्याची थकबाकी आहे त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (वर्षा बंगला), वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार (देवगिरी), शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे, (सेवासदन), गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता (पर्णकुटी), ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे (रॉयलस्टोन), आदिवासी मंत्री विष्णू सावरा (सागर), अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्ये मंत्री गिरीश बापट (ज्ञानेश्वरी), वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन (शिवनेरी), परिवहन मंत्री दिवाकर रावते (मेघदूत), उद्योगमंत्री सुभाष देसाई (पुरातन), पर्यावरण मंत्री रामदास कदम (शिवगिरी), सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे (नंदनवन), ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (जेतवन), सार्जनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत (चित्रकुट), सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले (सातपुडा), पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर (मुक्तागीरी), एकनाथ खडसे (रामटेक), मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षाकर्मी तोरणा, रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती (अजंथा) आणि सह्याद्री अतिथीगृह, व इतर शासकीय आवासांची नावे आहेत.

 

कोणत्या मंत्र्यांच्या आवासवर किती पाण्याची थकबाकी?

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

वर्षा,

जल जोडणी क्र. DX@0416917 रु. 142563/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जल जोडणी क्र.DX@0407631 रु.329238/- डिसेंबर 2016 पासून थकबाकी।

जल जोडणी क्र. DXX8160008 रु. 2029/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

जल जोडणी क्र. DXX8170002 रु. 17409/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

जल जोडणी क्र. DXX8180007 रु. 54418/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र.DXX819000 रु. 199324/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

 

एकूण थकबाकी रु. 744981/-

 

सुधीर मुनगंटीवार,

वित्तमंत्री

देवगिरी

जलजोडणी क्र. DXX7520005 रु. 77468/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX7510000 रु. 59627/- नोव्हेंबर 2018 पासून1 थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX9240000 रु.7960/- एप्रिल 2019 पासून थकबाकी

एकूण थकबाकी 145055/-

 

विनोद तावडे,

शालेय शिक्षणमंत्री

सेवासदन

जलजोडणी क्र. DXX7570008 एकूण थकबाकी रु. 155273/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

प्रकाश मेहता, गृहनिर्माण मंत्री पर्णकुटी

जलजोडणी क्र.DXX8260003 एकूण थकबाकी रु. 161719/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

 

पंकजा मुंडे,

ग्रामविकास, महिला व बालविकास मंत्री

रॉयलस्टोन

जलजोडणी क्र. DXX8610002 रु.16884/- जानेवारी 2019पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX8480003 रु. 10446/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र.DXX8490008 रु.7703/-ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

एकूण थकबाकी 35033/-

 

विष्णू सावरा,

आदिवासी मंत्री

सागर

जलजोडणी क्र.DXX7660009 रु. 162325/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र.DXX7670003 रु.19816/-ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

एकूण थकबाकी 182141/-

 

गिरीश बापट,

अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन संसदीय कार्यमंत्री

ज्ञानेश्वरी

जलजोडणी क्र.DXX8140009 एकूण थकबाकी रु. 59778/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

 

गिरीश महाजन,

वैद्यकीय शिक्षण जलसंपदा मंत्री

शिवनेरी

जलजोडणी क्र. DXX8100000 एकूण थकबाकी रु. 2023/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

 

दिवाकर रावते

परिवहनमंत्री

मेघदूत

जलजोडणी क्र. DXX7650004 एकूण थकबाकी रु. 105484/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

 

सुभाष देसाई,

उद्योगमंत्री

पुरातन

जलजोडणी क्र. DXX8290007 रु.148253/- मे 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX8300001 रु. 100990/-ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

एकूण थकबाकी 249243/-

 

रामदास कदम

पर्यावरण मंत्री

शिवगिरी

जलजोडणी क्र. DXX7580002 एकूण थकबाकी रु. 8988/- ऑक्टोबर 2018

 

मंत्री एकनाथ शिंदे,

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)

नंदनवन

जलजोडणी क्र. DXX8350004 187589/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX8360009 रु. 24199/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र.DXX8370003 रु.16636/- सप्टेंबर 2018 पासून थकबाकी।

एकूण थकबाकी रु. 228424/-

 

चंद्रशेखर बावनकुळे,

ऊर्जामंत्री

जेतवन

जलजोडणी क्र. DXX8060002 रु. 231676/- मार्च 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX9310002 रु.383178/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

 

एकूण थकबाकी 614854/-

 

डॉ. दीपक सावंत,

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री

चित्रकुट

जलजोडणी क्र.DXX8270008 एकूण थकबाकी रु.155852/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

 

राजकुमार बडोले,

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री

सातपुडा

जलजोडणी क्र. DXX8070007 एकूण थकबाकी रु. 106296/- मे 2018 पासून थकबाकी।

 

महादेव जानकर,

पशुसंवर्धन मंत्री

मुक्तागिरी

जलजोडणी क्र. DXX9320007 रु.119237 सप्टेंबर 2018 पासून1 थकबाकी।

DXX8110005 रु. 16953/- नोव्हेंबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX8120000 रु. 33546/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX8130004 रु. 3761/- मार्च 2019 पासून थकबाकी।

एकूणथकबाकी रु.173497/-

 

एकनाथ खडसे

रामटेक

जलजोडणी क्र. DXX9340006 141517/- जून 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX7540004 रु. 31908/- ऑक्टोबर 2018 पासून1 थकबाकी।

जलजोडणी क्र. DXX9350000 रु.45519/- मे 2018 थकबाकी।

एकूण थकबाकी रु.218998/-

 

मुख्यमंत्र्यांचे सुरक्षाकर्मी

तोरणा

जलजोडणी क्र.DXX8150003 एकूण थकबाकी रु.10682/- ऑक्टोबर 2018 पासून थकबाकी।

रामराजा निंबाळकर, विधानसभा सभापती अजंथा

जलजोडणी क्र.DXX7620000 एकूण थकबाकी रु. 29032/- ऑक्टोबर 2018पासून थकबाकी

जलजोडणी क्र.सह्याद्री अतिथीगृह DXX9290003 रु. 1018102/- ऑगस्ट 2018 पासून थकबाकी।

जलजोडणी क्र.DXX9290015 रु186288/-जून 2018थकबाकी।

एकूण थकबाकी रु.1204390/-

 

 देयके भरण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येतील

मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांच्या शासकीय निवासस्थानांच्या पाण्याची देयके नोव्हेंबर-2018 मध्येच भरण्यात आली होती. तथापी जुनी भरलेली देयके व मे-2019 मध्ये प्राप्त झालेल्या देयकांमध्ये तफावत आढळून आल्यामुळे ही देयके अदा करण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली होती.

संपूर्ण हिशोब केल्यानंतर ही देयके भरण्याची कार्यवाही तात्काळ करण्यात येत आहे, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुंबई शहर इलाखा विभागाला कळविले आहे. 

मुख्यमंत्र्यांचे वर्षा हे शासकीय निवासस्थान तसेच मंत्री महोदयांची निवासस्थाने, यासोबतच सह्याद्री राज्य अतिथीगृहाच्या पाणीपुरवठ्याची थकीत रक्कम नोव्हेंबरमध्येच अदा करण्यात आली होती. उर्वरित रक्कम भरण्याची कार्यवाही तत्काळ केली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.


या निवासस्थानांमध्ये मंत्री महोदयांशिवाय त्यांच्या कर्मचारी वर्गासाठीचीही घरे असतात. तसेच यामध्ये अभ्यागतांचाही समावेश असतो.

पाणी आणि वीजपुरवठ्याची देयके बंगल्याच्या नावावर येतात. ती कोणा विशिष्ट व्यक्तीच्या नावावर येत नाहीत. त्यामुळे ती विशिष्ट व्यक्तीने थकवली असे म्हणणे संयुक्तिक नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *