Thu. May 6th, 2021

मान्सून उशिरा आल्यानं पेरणी उशिरा करण्याचा मुख्यमंत्र्यांचा शेतकऱ्यांना सल्ला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खरीप हंगामाची आढावा बैठक नुकतीच पार पडली यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. यावेळी शेती संदर्भातील माहिती दिली. मान्सून उशिरा येत असल्याने पेरण्या उशिरा कराव्यात असा सल्ला त्यांनी दिला आहे. राज्यस्तरीय खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहित महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, सहकार मंत्री सुभाष देशमुख, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर सहभागी झाले.अनेक विभागाचे सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी ही बैठकीत उपस्थित होते.

मान्सून उशिरा मुख्यमंत्र्यांचा खुलासा

राज्यात सरासरी एवढ्या पावसाचा हवामान खात्याचा अंदाज  असल्याच मुख्यमंत्र्यांनी म्हटलं  आहे.

पाऊस लांबल्यानं पेरणी उशिरा करण्याचं आव्हान त्यांनी शेतकऱ्यांना दिलं आहे.

गेल्यावर्षी पाऊस कमी पडला तरी उत्पादकता वाढली आहे. असं ही ते म्हणाले आहेत.

खरीपाच्या नियोजनासाठी हवामान खात्याकडून बैठकीत सादरीकरण करण्यात आलं आहे.

सरकारकडे खतं आणि बियाणाचं पुरेसा साठा असल्याचं ही त्यांनी सांगीतलं आहे.

एकूण क्षेत्रापैकी 55-60% क्षेत्र कापसाच्या आणि सोयाबिनच्या लागवडीखाली आहे.

5 कोटी शेतकऱ्यांना पेरणी संदर्भात SMS पाठवलेत असंही ते म्हणाले.

मातीच्या उत्पादकतेचा विचार करून शेतकऱ्यांना सल्ला देण्याचा प्रयत्न करु

जूनमध्ये कमी पाईस पडण्याची शक्यता  मुख्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.

शेतकऱ्यांना सुरळीत कर्जपुरवठा होण्यासाठी सरकारचा प्रयत्न आहे,

कर्जमाफीला पात्र असलेल्या पण लाभ न मिळालेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे.

मद्य उत्पादनावर 3 महिने बंदी घालणे अशतक्य असल्याचं मत त्यांनी व्यत्क केली आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *