पुण्याची कचरा कोंडी फोडण्यात अखेर मुख्यमंत्र्यांना यश
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे
पुणे शहरातील कचराकोडी प्रश्नी घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांच्या बैठकीला यश आले आहे.
फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आहे.
त्यामुळे गेल्या 23 दिवसांपासून निर्माण झालेल्या कचरा कोंडीचा प्रश्न अखेर सुटला आहे.
फडणवीस यांनी रविवारी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्यामुळे ग्रामस्थांनी आपले आंदोलन मागे घेतले.