Jaimaharashtra news

नंदुरबार पोलिसांचा ढिसाळ कारभार, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेचा बोजवारा

जय महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार

 

नंदुरबारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा पोलिसांनी अक्षरश: खेळखंडोबा केला. आरोग्य शिबिरासाठी मुख्यमंत्री नंदुरबारमध्ये आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तयार करण्यात आलेल्या डीझोनमध्ये सर्रास ड्रोन कॅमेरा उडवण्यात आला.

 

अगदी मुख्यमंत्र्यांपासून काही फुटांवर हा कॅमेरा उडत होता. एक क्षण तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन उडता ड्रोन कॅमेरा अतिशय जवळ आल्याचं बघून विचलित झाले.

 

इतकंच नव्हे तर कॅमेरा लावण्यात आलेली क्रेनही याच डीझोनमध्ये लावण्यात आली होती. सुरक्षा पास नसलेल्या अनेक व्यक्ती या डी झोनमध्ये सर्रास फिरत होत्या. विशेष म्हणजे सुरक्षेचे तीन तेरा नंदुरबार विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विनय चौबे यांच्या उपस्थितीत वाजले.

Exit mobile version