Thu. May 6th, 2021

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : उद्धव ठाकरेंनी चैत्यभूमीवर जाऊन केले अभिवादन

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती आहे. शिवाय यानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दादर चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची जयंतीची साध्या पद्धतीने साजरी केला जात आहे. गेल्या वर्षी देखील आंबेडकर अनुयायांना साध्या पद्धतीने जयंती साजरी केली होती.
दादर चैत्यभूमी महापौर किशोरी पेडणेकर देखील उपस्थित होत्या. मुख्यमंत्री नागपूर दीक्षाभूमी येथेही जाणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. राज्य सरकारने आणि महानगरपालिकेने देखील घरीच आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्र्यांनी केले आहे. शिवाय त्यांच्या अनेक संबोधनातून त्यांनी कोरोनाविषयी सर्तकता बाळगा असं जनतेला सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले आवाहन..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 130वी जयंती उत्साहात आणि प्रथा परंपरेनुसार सन्मानाने साजरा केली जावी. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी न करता, घरातूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. बाबासाहेबांची जयंती हा उत्सव आणि आनंदाचा क्षण आहे. असं मुख्यमंत्री आणि जयंतीच्या नियोजन कार्यक्रमात सांगितले.

चैत्यभूमी :

चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखो अनुयायी देशभरातून अभिवादन करण्यासाठी येत असतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सर्वसामान्यांना येथे बंदी करण्यात आली आहे. यामुळे परिसरात यावेळी मात्र शांतता आहे. घरच्या घरी ऑनलाईन सेवेचा वापर करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करा असे आव्हान पालिकेकडून करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *