तुम्ही तुमच्या ‘होम मिनिस्टरचं’ ऐका – मुख्यमंत्री

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मी मिसेस मुख्यमंत्र्यांचे ऐकतोय, तुम्ही तुमच्या घरातील गृहमंत्र्यांचं ऐका, असंही मुख्यमंत्र्यांनी घरातील पुरुषमंडळींना उद्देशून म्हटलं.
काय म्हणाले मुख्यमंत्री ?
संवादाच्या सुरुवातीला मुख्यंमंत्र्यांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मी तुम्हाला काहीही नकारात्मक सांगायलो आलो नाही. मंगळवारी रात्री काहीशी गोंधळाची परिस्थितीमुळे दुपारी संवाद साधतोय. मी तुम्हाला काहीही सांगायलो आलो नाही. असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
युद्धात आपला शत्रू आपल्यावर नकळत हल्ला करत असतो. हा कोरोना शत्रूदेखील तसाच आहे. कुठून हल्ला कसा करेल, सांगता येत नाही.
घराबाहेर पाऊल आपण टाकलं तर शत्रू आपल्या घरात पाऊल टाकेल हे विसरु नका. त्यामुळे घरातच राहा, असं पुन्हा आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. कोरोनांमुळे अनेक कुटुंब एकत्र आले. त्यामुळे घरातील एसी बंद करुन खिडक्या उघड्या ठेवा, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हातावर पोट असणऱ्यांचं वेतन थांबवू नका. अडचणीच्या काळात माणुसकीच्या धर्माने वागा, अस आवाहन मुख्यमंत्र्यांनी कंपन्यांना केलं आहे.
लढवय्या महाराष्ट्र आहे. आपण जिंकणारच आहोत, आपल्याला जिंकायचंच आहे. गुढीपाडवा साजरा करायचा आहे. पण या संकटावर मात करुन विजयाची गुढी उभारायची असल्याचा निर्धार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
तसेच जीवनावश्यक आणि अत्यावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात कमी होणार नाही, बंदही होणार नाही. सोबतच वैद्यकीय सेवाही बंद होणार नाहीत असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा हा ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ११२वर पोहचला आहे. इस्लामपूरमधील एकूण ५ रुग्ण आढलळ्याने हा आकडा ११२वर पोहचला.
तर एक दिलासादायक बातमी आहे. सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातील २ कोरोनाग्रस्तांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
तर कोरोनाचा आणखी एक बळी गेला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृतांचा आकडा हा ११वर पोहचला आहे.
तामिळनाडुतील मदुराईमध्ये हा कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री सी. विजयभास्कर यांनी दिली आहे.