Wed. Aug 10th, 2022

घर पेटवणं सोपं, गरीबाच्या घरची चूल पेटली पाहिजे – मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील गरीब जनतेच्या दररोजच्या अनेक समस्या आहेत. घर पेटवणं सोपं असते, पण गरिबाच्या घरी चूल आधी पेटली पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

ते औरंगाबादेत बोलत होते. मुख्यमंत्री झाल्यानंतरचा उद्धव ठाकरेंचा हा पहिलाच मराठवाडा दौरा आहे.

औरंगाबादेत एडव्हानटेज महाराष्ट्र एक्सपो २०२० प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केले. यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला पालकमंत्री सुभाष देसाई, मंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री संजय बनसोडे हे उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे

तुम्हाला तुमच्या पायावर खंबीरपणे उभं करणार हे सरकार आहे.

अडी अडचणी खूप आहेत. सरकार स्थापन करताना किती अडचणी होत्या. पण त्यावरही आम्ही मात केली.

तसेच उद्योदकांना उद्योग क्षेत्रात अडचणी आहेत. मात करायची असते. हिंमत पाहिजे, जिद्द पाहिजे.

माझ्या उद्योजकांमध्ये ती हिमंत आहे, जिद्द आहे, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी उद्योजकांवरील विश्वास व्यक्त केला.

देशाचं लक्ष वेधू शकतो, असं हे प्रदर्शन आहे. या पर्दशनात राज्यातील नाही तर देशातील उद्योजक आले आहेत.

येत्या काही वर्षात आंतरराष्ट्रीय प्रदर्शन करता येईल, असे केंद्र उभारुन देईन, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं.

मंदी आली म्हणून रडत बसलो, रडणारे कधी लढू शकत नाही, रडणारे तसे जगू शकत नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

जो लढतो तो जगतो. महाराष्ट्राला लढण्याची परंपरा आहे.

शेतकरी अडचणीत आहे. त्याला आपण कर्जमुक्त करतोय, करणारच. यासोबतच मला शेतकऱ्यांना चिंतामुक्त देखील करायचंय.

बिडकीन येथे ५०० एकर परिसरात अन्नप्रक्रिया उद्योग केंद्र उभारणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

यामध्ये १०० एकरवरील उद्योग महिलांसाठी आरक्षित ठेवणार असल्याची, इच्छा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.