मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विधानसभेत मोठ्या घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विधानसभेत अनेक घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी विदर्भाच्या विकासासह राज्यातील मंत्रालय सुरु करणार असल्याची घोषणा देखील केली.
काय बोलले उद्धव ठाकरे ?
समृद्धी महामार्ग हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट. या समृद्धी महामार्गासाठी कर्ज घेणार नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच या प्रकल्पासाठी सरकार पैसा उभारेल.
रस्त्यांच्या सुधारणेसाठी देखील विशेष प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी 200 रुपयांच्या वाढीची घोषणा केली. या वाढीमुळे आता शेतकऱ्यांना 2500 रुपये हाती मिळतील.
उद्धव ठाकरेंनी प्रत्येक विभागात मंत्रालय सुरु करण्याची घोषणा केली. हे मंत्रालय मुंबईतील मंत्रालयाशी कनेक्टेड ठेवणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
तसेच प्रत्येक विभागात मु्ख्यमंत्री कार्यालय सुरु करणार असल्याची घोषणा देखील केली.
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे
यवतमाळसाठी विशेष निधीची मुख्यमंत्र्यांची घोषणा.
कोणताही अनुशेष बाकी ठेवणार नाही.
प्रकल्पांना स्थगिती नव्हे, तर केवळ सुधारणा.
जमशेदपूर भिलाई सारखा स्टील प्रोजेक्ट पूर्व विदर्भात उभारणार.
कामे स्थगितीने नाही तर गतीने करणार.
विरोधी पक्ष आणि सत्ताधारी एकत्र येऊन काम करू.
कुठल्याही सिंचन प्रकल्पाला स्थगिती दिलेली नाही.
गोसेखुर्दचं काम पूर्ण करणार.
संपूर्ण ताकदीनिशी विदर्भाचे प्रश्न सोडवणार.
अधिवेशनात भाषणादरम्यान कुणी दुखावलं तर माफी.
विदर्भाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सभागृहात भाषण.