Wed. Dec 1st, 2021

मुख्यमंत्र्य़ांच्या हस्ते एमएमआरडीएच्या प्रकल्पाचं भूमिपूजन

मेट्रो प्रवासाचा दुसरा टप्पा अखेर सुरु होण्याच्या मार्गावर असून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून आजपासून डहाणूकरवाडी ते आरे मेट्रो स्टेशनदरम्यान चाचणी सुरू झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मेट्रो चाचणीला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. यावेळी आकुर्ली स्थानकात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर, छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ ला पोहोचण्यासाठी एमएमआरडीएकडून भुयारी आणि उन्नत मार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले आहे. २४ महिन्यात हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

एकूण २० किलोमीटरच्या मार्गावर या चाचण्या सुरू होतील. मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या मार्गावरील मेट्रो दोन टप्प्यात धावणार आहे. ऑक्टोबरमध्ये पहिला टप्पा प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार असून दुसरा टप्पा जानेवारी २०२२ पर्यंत सुरू होणार आहे.

कोरोना प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांचा परिणाम मेट्रो कामांवर होत होता. मात्र सर्व अडथळ्यांवर मात करून मेट्रो कामे वेगाने पूर्ण करण्यात आली. यामुळे पूर्व नियोजनानुसार मेट्रो चाचणी पार पडत असल्याचे एमएमआरडीएतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *