Sat. Jul 4th, 2020

महिला अत्याचारांच्या घटनांची मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल

राज्यात गेल्या काही दिवसांमध्ये महिलांवरील अत्याचारांच प्रमाण वाढलं आहे. या घटनांची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याचे आदेश गृहविभागाला दिले आहेत.

महिला आणि बालकांची सुरक्षितता हा सरकारचा प्राधान्याचा विषय आहे. याबाबत हयगय करणाऱ्यांना माफी नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.

कामात हयगय किंवा विलंब करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाईल. या संदर्भातील कामात हयगय करणाऱ्या पोलीस यंत्रणेतील कोणत्याही कर्मचाऱ्यावर कारवाई केली जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.      

घडलेल्या गुन्ह्यांचा एफआयआर तत्काळ नोंदवणे, लवकरात लवकर तपास सुरु करणे, गुन्हा सिद्धतेसाठी आवश्यक असलेल्या पुराव्यांचे संकलन करणे. यासाठी पोलीस आणि संबंधित यंत्रणेला अधिक सजग आणि दक्ष पणे काम करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

महिलांना मोकळेपणाने आपल्यावरील अत्याचाराची माहिती पोलीस ठाण्यात येऊन नोंदवता यावी यासाठी  प्रत्येक जिल्ह्यात महिला पोलीस ठाणी सुरु करण्यासंबंधी गृहविभागाने चाचपणी करावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *