…यानंतर मुख्यमंत्री अयोध्येला जाणार – संजय राऊत

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होऊन आता २ महिन्याभरापेक्षा जास्त काळ उलटला आहे.
सत्तेवर येताच महाविकासआघाडीने कामाचा आणि निर्णयाचा सपाटा लावला आहे. संजय राऊत यांचं सत्तेस्थापनेसाठीचे महत्वपूर्ण योगदान आहे.
सरकार जोरात कामाला लागले आहे. महाविकास आघाडीचं सरकार ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
तसेच महाविकासआघाडी सरकारला १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.
याबाबतीत त्यांनी ट्विट केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्विटला अवघ्या तासाभरात हजारपेक्षा लाईक केले गेले आहे.
प्रभू श्रीरामाचे दर्शन घेऊन मुख्यमंत्री पुढील कामाची दिशा ठरवणार असल्याचे राऊत ट्विटद्वारे म्हणाले आहेत.
दरम्यान उद्धव ठाकरे याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आपल्या १६ खासदारांसह जून २०१९ ला अयोध्येत गेले होते.
तसेच नोव्हेंबर २०१८ ला उद्धव ठाकरे सहपरिवार २ दिवसांच्या अयोध्या दौऱ्यावर गेले होते.