Sun. Aug 18th, 2019

‘या’ कारणामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल

0Shares

सीएनएन मीडिया कंपनीचे व्हाईट हाऊस प्रतिनिधी जीम अकोस्टा यांचं प्रेस ओळखपत्र रद्द केल्याप्रकरणी सीएनएनने डोनाल्ड ट्रम्प आणि व्हाईट हाऊस विरोधात खटला दाखल केला आहे. गेल्या आठवड्यामध्ये व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पत्रकार जीम अकोस्टा यांच्यामध्ये बाचाबाची झाली होती.

 

trum-pic1.jpg

 

विस्थापितांबाबत प्रश्न विचारल्यानंतर भडकलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी जिम यांचा जाहीर पत्रकार परिषदमध्ये अपमान केला होता. तसेच ट्रम्प यांनी जिम यांना माईक बंद करून बसायला सांगितलं.

 

trump-pic4.jpg

एवढं करून न थांबता व्हाईट हाऊसकडून जिम यांचं प्रेस ओळखपत्रही काढून घेण्यात आलं. हे ओळखपत्र परत देण्याच्या मागणीसाठी सीएनएनने कोर्टात धाव घेतली आहे.

0Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *