सांगलीत अकरा लाखांचे कोकेन जप्त

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरजवळलील वाघवाडी फाटा येथे एका खासगी बसमधून बेकायदा कोकेन अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणाला पोलिसांनी अटक केले आहे. माकेटो जॉन झाकिया असे या आरोपीचे नाव आहे.
बेकायदा अंमली पदार्थ बाळगून प्रवास करणाऱ्या टांझानिया देशातील तरुणाला सांगली पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ११ लाख रुपये किंमतीचे १०९ ग्रॅम कोकेन हस्तगत केला आहे. तसेच त्याच्यावर इस्लामपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दिक्षित गेडाम यांनी सांगितले आहे. पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.