Fri. May 7th, 2021

नवा ट्रेंड : तुम्ही स्वीकारणार का हे #cockroachchallenge ?

सोशल मीडियावर एकाहून एक विचित्र challenge चे trends सुरू होत असतात. यापूर्वी Ice Bucket challenge, किकी चॅलेंज, 10 year challenge अशी विविध चॅलेंजेस वेळोवेळी गाजली. आता आणखी एक नवं challenge सुरू झालं आहे. हे चॅलेंज पाहून कदाचित तुम्हाला किळस वाटेल किंवा कदाचित तुम्ही हे challenge स्वीकारालही…

काय आहे हे चॅलेंज?

झुरळाचं नाव जरी काढलं तरी अनेक मुली किंचाळतात…

झुरळ दिसलं तर काही खैरच नसते… भीतीने ओरडून ओरडून घरं डोक्यावर घेणारे लोकही तुम्ही पाहिले असतील.

मात्र आता आलंय ‘cockroach challenge’.

20 एप्रिलपासून या challenge ला सुरूवात झाली आहे.

म्यानमारच्या यानगाँग येथील Alex Aug या तरुणाने चेहऱ्यावर चक्क झुरळ ठेवलेले फोटो social media वर पोस्ट केला.

या फोटोसोबत नवं चॅलेंज… तुम्ही हे करू शकता का? असा सवालही केलाय.

या फोटोमुळे या challenge ची  craze सुरू झाली.

#kikichallenge पडतोय महागात…

 

अनेकांनी हे आव्हान स्वीकरलंय आणि आपल्या चेहऱ्यावरही झुरळ ठेवत आपले फोटो social media वर व्हायरल केले आहेत.

काही जणांनी एकच नव्हे, तर भरपूर झुरळं आपल्या चेहऱ्यावर ठेवून फोटो काढले आहेत, तर एकीने तर चक्क तोंडात झुरळ घेऊन पोटो टाकला आहे.

हे ही वाचा-

सोशल मीडियावर क्रेझ #fallingstarschallenge ची!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *