Sun. Jun 20th, 2021

आचारसहिता भंग; 4428 गुन्हे दाखल

लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.10 मार्च 2019 पासून या निवडणुकीची आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली  आहे. हा निवडणूकीतील सर्वात महत्वाचा टप्पा आहे.

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता भंग तसेच अवैध मद्य बाळगणे आदी प्रकरणात 4 हजार 428 गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या दिवसापासून आचारसंहिता अंमलात आली. निवडणूक प्रशासनाकडून राज्यात काटेकोर पद्धतीने आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू आहे.

11 मार्चपासून हे  गुन्हे दाखल

परवाना नसलेली 328 शस्त्रे, 81 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत

8 हजार 302 जिलेटीन आदी स्फोटक पदार्थ ताब्यात घेण्यात आली आहेत.

शस्त्र परवानाधारकांकडून 32 हजार 797 शस्त्रे जमा करुन घेण्यात आली आहेत.

16 हजार 380 प्रकरणात अंतरिम बंधपत्र (इंटरिम बॉण्ड) घेण्यात आले आहेत.

सीआरपीसीच्या 6 हजार 228 प्रकरणात अंतिम बंधपत्र घेण्यात आले आहे.

131 प्रकरणात परवाना असलेली शस्त्रे कायद्याचा भंग व इतर कारणांमुळे जप्त करण्यात आली आहेत.

19 हजार 157 प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आली असून 21 हजार 264 प्रकरणात ही कार्यवाही सुरू आहे.

फौजदारी व्यवहार संहितेअंतर्गत (सीआरपीसी) प्रतिबंधात्मक कारवाईची 63 हजार 608 प्रकरणे विचारात घेण्यात आली.

दिनांक 11 मार्चपासून आजपर्यंत कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने राज्यभरात पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभागाकडून कार्यवाही सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *