Sun. Jun 20th, 2021

‘कॉफी विथ डी’च्या निर्मात्याला ‘डी’ गँगकडून धमक्या, अखेर केली आत्मह’त्या

अंडरवर्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या जीवनावर आधारित ‘कॉफी विथ डी’ या चित्रपटाची निर्मिती करणारे निर्माते विनोद रमानी यांनी आत्महत्या केली आहे. दाऊदच्या हस्तकाने त्यांना चित्रपट प्रदर्शित केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती. या चित्रपटात कोट्यवधी रूपये गुंतवल्यामुळे कर्जबाजारी झालेले विनोद यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्या नंतर सर्वांनाच धक्का बसला.

विनोद रामाणी नागपूरचा एक सामान्य औषध व्यावसायिक होता.

मुंबईच्या चंदेरी दुनियेत पाय रोवण्याचा त्याने प्रयत्न केला

मात्र हे पाऊल उलटं पडलं आणि अंडरवर्ल्डच्या धमक्या त्यांना येऊ लागल्या.

सिनेमा प्रदर्शित करू नये यासाठी त्यांना धमकावण्यात येऊ लागलं.

सिनेमामध्ये आधीच कोट्यवधी रुपये गुंतल्यामुळे तो प्रदर्शित करणं ही रमानी यांनी गरज होती.

मात्र सिनेमा रिलीज न केल्यामुळे त्यांना आर्थिक नुकसान सोसावं लागलं, ज्यामुळे त्यांच्यावर आत्महत्या करण्याची वेळ आली.

‘कॉफी विथ डी’

विनोद रमानी यांनी 2016 मध्ये “कॉफी विथ डी’ या चित्रपटाची निर्मीती केली होती.

या चित्रपटाचे लेखन-दिग्दर्शन विशाल मिश्रा यांनी केले होते.

या चित्रपटात कॉमेडी स्टार सुनील ग्रोवर आणि दिपानित्ता शर्मा प्रमुख भूमिकेत आहे.

2017 मध्ये हा चित्रपट बनून तयार झाला होता.

रामानी आणि मिश्रा यांनी मोठया कार्यक्रम आयोजित करून नागपूरच्या जसवंत थेटर मध्ये प्रमोशनही केलं.

चित्रपटाचे प्रोमो Youtube वरही गाजत होते.

मात्र, दाऊद इब्राहिमची खिल्ली उडविल्यामुळे अंडरवर्ल्डमध्ये मोठी खळबळ उडाली होती.

त्यामुळे दाऊदचा ‘राईट हॅंड’ छोटा शकील याने चित्रपट निर्माते विनोद रामानी यांना फोनवरून धमकी दिली होती.

शकील याने विनोद यांना चित्रपटातील संवाद बदलण्याची तसेच दाऊदची खिल्ली उडविणारे सिन कट करण्याचे सांगितले होते.

तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली होती.

त्यामुळे घाबरून विनोद रामानी आणि विनोद मिश्रा यांनी चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला होता.

अखेर केली आत्महत्या!

या चित्रपटात विनोद यांनी चार ते पाच मित्रांच्या मदतीने कोट्यवधी रूपये चित्रपटाच्या निर्मितीवर खर्च केले होते.

मात्र, दाऊद इब्राहिमच्या धमकीमुळे तो चित्रपट प्रदर्शित झाला नाही. त्यामुळे विनोद यांच्यावर कोट्यवधीचे कर्ज होते.

कर्ज फेडताना त्यांची बरीच दमछाक झाली होती.

त्यामुळे ते काही महिन्यांपासून तणावात होते.

गेल्या तीन दिवसांपूर्वी पत्नी आणि मुले माहेरी गेले होते.

त्यामुळे विनोद एकटेच घरी होते.

त्यांनी घरात सिलींग फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली.

तहसील पोलिसांना माहिती पोलिसांनी दार तोडून आत प्रवेश केला. रामानी यांचा मृतदेह खाली उतरवून उत्तरीय तपासणीसाठी मेयोत पाठवला. या प्रकरणी तहसील पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करीत पुढील तपास सुरू केला. मात्र अंडरवर्ड चा बॉलिवूड मध्ये किती हस्तक्षेप आहे हे यातून स्पष्ट होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *