तृतीयपंथीयांचा सामूदायिक विवाह, मुख्यमंत्री करणार कन्यादान!

सामूदायिक विवाह आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत असतात. मात्र छत्तीसगढच्या रायपूर येथे असा सामूदायिक विवाह होतोय, ज्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे. हा विवाह तृतीयपंथीयांचा असून देशभरातील विविध जोडपी यामध्ये सहभागी होणार आहेत.

कधी आहे विवाह?

चित्रगाही फिल्म्स कंपनीतर्फे तृतीयपंथीयांचा सामूदायिक विवाह आयित करण्यात आला आहे.

आगामी 30 मार्च रोजी रायपुर येथे हा विवाह होणार आहे.

या विवाहामध्ये 15 जोडपी सहभागी होणार आहेत.

अशा पद्धतीचा हा सर्वांत मोठा सामूदायिक विवाह असणार आहे.

त्यामुळे या विवाहाची नोंद गिनिज बुक फ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.

या विवाह समारंभात 15 तृतीयपंथी आपल्या पुरूष साथीदारांना वरमाला घालणार आहेत.

विशेष म्हणजे छत्तीसगढ़चे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे केवळ या समारंभाला उपस्थितच राहणार नसून स्वतः तृतीयपंथीयांचं कन्यादानही करणार आहेत.

सामूहिक विवाहामध्येही आता लैंगिक समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी या सामूहिक विवाहाचं आयोजन करण्यात आलंय. तृतीयपंथीयांना अजूनही समाजात म्हणावा तितका मान मिलत नाही. त्यांनाही लग्न करून आपल्या जोडीदाराबरोबर संसार करण्याचा अधिकार आहे. आपल्या अधिकाराची जाणीव झाल्यामुळे देशभरातील अनेक तृतीयपंथी आपल्या जोडीदारांशी लग्नगाठ बांधणार आहेत.

Exit mobile version