Tue. Jun 28th, 2022

नागपूर विद्यापीठात ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे

  राज्यात कोरोना संख्येत घट असल्यामुळे राज्यातील महाविद्यालयांचे दार विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले. याच पार्श्वभूमीवर नागपूर विद्यापिठाने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने ५० टक्के परीक्षांची जबाबदारी महाविद्यालयांकडे देण्यात आली आहे.

  बीए. बीएसी, बीकॉम, बीबीए, बीसीसीए, बीसीए, बीए (आरएस), बीएसी (गृहविज्ञान), बीएसी (आयटी), बीएसी (फॉरेन्सिक सायन्स), बीसीटी, बीएफडी, बीआयडी, बीटीएस, बीजेडी, बीएसी (फायनन्स), बीव्होक, बीएसडब्ल्यू, बी.लिब या अभ्यासक्रमांच्या ५० टक्के परीक्षा महाविद्यालयांकडून होणार असल्याचा निर्णय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने घेतला आहे.

  नागपूर विद्यापीठाने दिलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी २०२१-२२च्या पहिल्या सत्रापासून होणार आहे. याबाबत विद्यापीठाने सूचना जारी केली आहे. राज्य शासनाच्या केंद्रिभूत प्रवेशांतर्गत ज्या विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत अशा अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे आयोजन महाविद्याल्यांना करावे लागणार आहे.  २०२२पासून पहिल्या व तिसऱ्या तसेच २०२३पासून सर्व विषम सत्रांमधील परिक्षांचे आयोजन करण्यात येणार आहेत.

  विदयापीठात प्राध्यापकांची कमी आहे. त्यातच वेळेवर अभ्यासक्रम पूर्ण करणे, विविध समित्यांच्या दौऱ्यांची तयारी करणे, आणि त्यात विद्यार्थ्यांच्या परिक्षांचे आयोजन करणे या र्सव कामांमध्ये प्राध्यापक व्यस्त असतात. त्यामुळे विद्यापीठाच्या निर्णायामुळे महाविद्यालयांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.