Fri. Oct 7th, 2022

विनोदवीर राजू श्रीवास्तव शुद्धीवर आले

राजू श्रीवास्तव यांच्या चाहत्यांना दिलासा देणारी बातमी आहे. गुरूवारी सकाळी राजू यांना शुद्ध आली. राजू गेल्या १५ दिवसांपासून एम्स रुग्णालयात दाखल आहेत. राजू बरे होतील अशी आशा सर्वांना होती. देशभरातून त्यांचे चाहते राजू यांच्यासाठी प्रार्थना करत आहेत आणि आता राजू  शुद्धीवर आले आहेत.

‘राजू श्रीवास्तव यांना गुरूवारी सकाळी ८.१०वाजता शुद्ध आली. हळूहळू त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. राजू श्रीवास्तवर शुद्धीवर आल्याने  कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर हसू उमलले आले आहे. राजू लवकर बरे व्हावा यासाठी प्रार्थना करणाऱ्या राजूच्या सर्व चाहत्यांनीही सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

गेल्या १० ऑगस्टला जिममध्ये वर्कआऊट करताना राजू श्रीवास्तव अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. १० ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राजू श्रीवास्तव यांनी ‘टी टाइम मनोरंजन’ या टीव्ही शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. दूरदर्शनवरील शोमध्ये राजू, सुरेश मेनन आणि ब्रजेश हरजी यांसारख्या कलाकारांसोबत स्टेज शेअर करताना दिसले. ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’मधून त्यांना खरी ओळख मिळाली. या शोमध्ये त्यांनी आपला यूपीचा अंदाज दाखवला आणि आपल्या पंच लाइनने लोकांना हसवलं.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.