Fri. Sep 30th, 2022

विनोदीवीर राजू श्रीवास्तव यांचं निधन

गेल्या काही दिवसापासून सुरू असलेली झुंज अखेरीस संपवून या विनोदी अभिनेत्याचे निधन झाले आहे. प्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांची वयाच्या ५९ व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसापासून त्यांची मृत्यूची झुंज सुरू होती.

राजू श्रीवास्तव हे व्यायामशाळेत ट्रेडमिलवर धावत असताना त्यांना १० ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्या छातीत दुखू लागल्यानंतर ते अचानक खाली पडले. यानंतर त्यांना प्रशिक्षकाने तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. राजू श्रीवास्तव यांची अँजिओग्राफी करण्यात आली. अनेकदा त्यांना व्हेंटिलेटर वर ठेवण्यात आले होते. त्यांचे व्हेंटिलेटर काही दिवसापूर्वी काढण्यात देखील आले होते. मात्र, बुधवारी त्यांची प्राणजोत मालवली.

राजू श्रीवास्तव यांनी आपल्या जबरदस्त अशा विनोदाने सर्वांचे मन जिंकले आहेत. त्यांनी अनेक कॉमेडी शो केले आहेत. त्यांनी केलेले कॉमेडी शो प्रेक्षकांना प्रचंड आवडते आणि राजकारणात देखील सक्रिय असतात. मात्र समाजकार्याची आवड असल्यामुळे त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करणे सुरू केले. राजू श्रीवास्तव यांचे खरे नाव सत्यप्रकाश श्रीवास्तव असे आहे.

त्यांचा जन्म २५ डिसेंबर १९६३ मध्ये झालेला आहे. उत्तर प्रदेशातल्या कानपूर मध्ये ते लहानाचे मोठे झाले. ते एक विनोद वीर म्हणून ओळखले जातात. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या शोमध्ये त्यांनी स्टँड अप कॉमेडी करून नाव कमावले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. अनेक चित्रपट प्रदर्शन वितरण सोहळ्यामध्ये त्यांनी सूत्रसंचालन तसेच आपले विनोद सगळ्यांना ऐकवले आहेत.

2 thoughts on “विनोदीवीर राजू श्रीवास्तव यांचं निधन

  1. I would like to thnkx for the efforts you have put in writing this blog. I am hoping the same high-grade blog post from you in the upcoming as well. In fact your creative writing abilities has inspired me to get my own blog now. Really the blogging is spreading its wings quickly. Your write up is a good example of it.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.