राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सुरूवात

राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला आजपासून सुरूवात झाली आहे. भंडारा जिल्हा परिषद, पंचायतसमिती तसेच नगरपंचायतीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात झाली आहे.
जळगाव जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात मंगळवारी १७ पैकी ४ जागांसाठी निवडणूक होत आहे. तर या निवडणुकीसाठी १५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
अमरावती जिल्ह्यात दोन नगरपंचायतीच्या मतदानाला सकाळी साडेसात वाजतापासून सुरूवात झाली असून तिवसा आणि भातकुली येथे दोन नगरपंचायतीसाठी मतदान होत आहे. ओबीसीच्या जागांसाठी तिवसासाठी तीन जागा तर भातकुलीसाठी एका जागेवर मतदान होणार असून चार जागांसाठी १७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.
देहूमध्ये नगरपंचायतीच्या उरलेल्या चार प्रभागासाठी निवडणूक प्रक्रिया होत असून एकूण १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. तर चार जागांसाठी देहूमध्ये चुरशीची लढत होणार आहे.
This article gives the light in which we can observe the reality. This is especially nice one and gives in-depth information. Thanks for this nice article.